Search

MPSC Topper - Prasad Chougule
कराडमधल्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमधून त्यांनं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. एक वर्षं नोकरी केली तेव्हाच प्रसादने MPSC च्या अभ्यासासाठी पैसे साठवले होते, जेणकरून तयारी दरम्यान घरच्यांवर ताण येणार नाही. 2017 मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर प्रसादचं शेवटच्या वर्षी कँपसमधून प्लेसमेंट झाली पुण्यात त्याने एक वर्ष नोकरी केली. पण कार्पोरेट जगात मन रमलं नाही. म्हणून जुलै 2018मध्ये नोकरीचा राजीनामा दिला आणि पुण्यात MPSCची तयारी सुरू केली."MPSCचा अभ्यास सुरू करताना तुमचा वर्षभराचा प्लॅन तयार असायला पाहिजे. जेणेकरुन तुमचा वेळ वाचू शकतो. नाहीतर 'ट्रायल आणि एरर'मध्येच अनेकजण अडकतात. ही परीक्षा अशा लोकांसाठी मुळीच नाहीये. सॉलिड प्लॅन केला तर लवकरात लवकर यश मिळू शकतं. एकदा का पूर्वपरीक्षा नापास झाला तर तुमची पुढची अडीच वर्षे वाया जातात."🎯अभ्यासाची तयारी कशी करावी ?●पूर्ण वर्षाचा प्लॅन तयार करा.

●स्पीड रीडिंग करायला शिका.

●वर्तमान पत्रावर वेळ घालवू नका.

●रोज MCQ सोडवा.

●मुख्य परीक्षेची आधी तयारी करा.

●इंग्लिश आणि मराठीचा पेपरकडे गांभीर्यानं पाहा

●कोचिंग क्लासची गरज नाही पण...

MPSC च्या अभ्यासाच्या सुरुवातीला वर्षभराचं प्लॅनिंग करायला पाहिजे. सगळा सिलॅबस समजून घ्यावा. आधीच्या प्रश्नपत्रिका चाळाव्यात. आयोगाने कोणत्या विषयाला किती महत्त्व दिलं आहे, ते बारकाईने पाहावं. मग तज्ज्ञांचं योग्य मार्गदर्शन घ्यावं. त्यामुळे एकंदर आपला दृष्टिकोन कसा असावा हे लक्षात येतं. अभ्यासाच्या सुरुवातीला रेफरन्स बुक्स वाचावीत," असं प्रसादनं सांगितलं.


"कोणतंही वाचन करताना मी वाचनात स्पीड ठेवला. आवाका मोठा असल्यानं ते उरकण्यासाठी जलद वाचनाची सवय करून घ्यायला पाहिजे. अभ्यास करताना तसंच परीक्षेच्यावेळीही याचा खूप फायदा होतो. कारण सगळेच पेपर वेळेत सोडवता येत नाहीत. तुमच्या कामात स्पीड असेल तर ते सहज शक्य आहे. सकाळचा वेळ बेसिक किंवा रेफरन्स बुक्स यावर घालवला, तर दुपारी अगदी 20-30 मिनिटे न्युजपेपर वाचायचो. पण अनेकजण पेपरमध्येच खूप वेळ घालवतात. ते मला वाटतं योग्य नाहीये. पेपरमधल्या सगळ्याच बातम्या महत्त्वाच्या नसतात. ठराविक बातम्या वाचायला पाहिजेत."


दररोज केवळ अभ्यास करणं चुकीचं आहे. दिवसभरातला काहीवेळ हा जुने प्रश्न सोडवण्यात घालवला पाहिजे, असंही प्रसादला वाटतं.


"मी रोज संध्याकाळी जेवण झाल्यावर 40 ते 50 MCQ (Multiple Choice Questions) सोडवायचो. मला वाटतं त्याचा मला सगळ्यात जास्त फायदा झालाय. सकाळी 7 च्याआधीच मी लायब्ररीत जायचो. एकावेळी मी एकाच विषयाचा अभ्यास करायचो. संध्याकाळी त्या विषयाचे प्रश्न सोडवायचो,"


"मी मुख्य परीक्षेचा जवळजवळ 70 ते 80 टक्के अभ्यास हा पूर्व परीक्षेच्याआधीच केला. मग शेवटच्या 3 महिन्यात पूर्व परीक्षेचा अभ्यास सुरू केला. कारण मुख्य परीक्षा तुमचं भवितव्य ठरवते आणि पूर्व परीक्षेनंतर त्याच्या अभ्यासाला वेळ पुरत नसल्याचं," असंही प्रसादने सांगितलं.


224 views4 comments

Recent Posts

See All